बनावट एटीएम कार्डप्रकरणी नायजेरियन नागरिकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पुणे - बनावट एटीएम कार्ड तयार करून त्याद्वारे 43 हजार रुपये काढल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आणखी एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याला 25 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

याप्रकरणी नितीन अस्वरे (रा. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी इऱ्हेम्हन स्मार्ट (वय 33, रा. बंगळूर, मूळ रा. नायजेरिया) याला अटक केली. या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी आग्बेग्ज फॉरच्युन, बशर डाकीनगरी उस्मान, आयफेनी माईक म्बाझे या नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. जून महिन्यात हा गुन्हा घडला होता. 

आरोपींनी अस्वरे यांच्या ऍक्‍सिस बॅंकेतील खात्याच्या एटीएम कार्डची माहिती चोरली. त्या आधारे बनावट कार्ड तयार करून पैसे काढले होते. आरोपींकडून सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी बनावट एटीएम कार्ड तयार करण्यासाठी वापरलेले यंत्र (स्कीमर) कोठून मिळविले, फिर्यादीच्या कार्डची गोपनीय माहिती कशी मिळविली, या प्रकारचे आणखी किती गुन्हे केले, याचा तपास पोलिस करीत आहेत. 

Web Title: pune news Nigerian citizens arrested