पुणेः नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करणारे दांपत्य ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणेः अहमदनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा खून करून पसार झालेले दांपत्याला विश्रामबाग पोलिसांनी शिताफीने नुकतेच ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील एमआयडीसीमधील राजलक्ष्मी कंपनीसमोर असलेल्या भाटीया कँटीनजवळ अशोक सोमई (वय 70, रा. ठाणे) यांचा 3 जुलै 2017 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास खून झाला होता. अनिल गायकवाड हा सुरक्षारक्षकाचे तेथे काम करत होता. खून झाल्यानंतर अनिक गायकवाड व त्याची पत्नी प्राची हे दांपत्य फरार झाले होते. खुनाच्या घटनेनंतर गायकवाड दांपत्याविरुद्ध तक्रार दाखल झाली होती.

विश्रामबाग पोलिस ठाणेमधील कर्मचारी नाईक बाबा दांगडे यांना खबऱयाकडून गायकवाड दांपत्य एका चहाच्या टपरीवर चहा पित असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांनी खूनाची कबुली दिली. अनिलवर खून, खूनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत.

अपर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ 1चे पोलिस उप-आयुक्त बसवराज तेली, सहाय्यक पोलिस आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामगाब पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे, पोलिस उप-निरीक्षक महेंद्र पाटील, पोलिस हवालदार शरद वाकसे, सचिन सुपेकर, बाबा दांगडे, सचिन जगदाळे, धीरज पवार, अर्चना पेरणे व रेखा बनकर यांनी कारवाई केली.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

पुणे

पिंपरी - माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी घेतलेल्या सराईत गुन्हेगारांना पळवून लावण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना...

07.21 PM

हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील नियोजीत कचरा प्रकीया प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. हडपसर प्रभाग...

07.15 PM

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य...

05.12 PM