"रंगपंढरी' ठरले विनोदवीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - सभागृह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेले... प्रत्येकाचे लक्ष निकालाकडे लागलेले... करंडक कोणाला मिळणार, याची प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आणि धाकधूकही... पण अनेकांचे सत्कार, अनेकांची मनोगते यामुळे सभागृहात काहीशी निराशा पसरलेली... दीड-दोन तासांच्या अवधीनंतर प्रत्यक्ष निकाल जाहीर होऊ लागला, तेव्हा सभागृहातील वातावरण "आवाज कोणाचा', "म्हणूनच आम्ही' अशा घोषणांनी दणाणून गेले. अशा जल्लोषमय वातावरणातच "चि. श्री. व सौ. साखरे' या एकांकिकेबद्दल "रंगपंढरी' संस्थेला "विनोदोत्तम करंडक' प्रदान करण्यात आला. 

विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, "महावितरण'चे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले. "विनोदोत्तम करंडक'चे संस्थापक हेमंत नगरकर, अध्यक्ष मनोहर कोलते, उपाध्यक्ष राजीव पुणेकर उपस्थित होते. मॉडर्न महाविद्यालयाच्या "सील' एकांकिकेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, तर "आयएमसीसी'च्या "तुझा माझ्यावर भरोसा नाय का?' या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. सप्तरंगी पुणे आणि फोर्थ वॉल एंटरटेंमेंन्ट यांना "उत्तेजनार्थ पुरस्कार', तर अहिल्यादेवी प्रशालेला "शिस्तबद्ध संघ पुरस्कार' देण्यात आला. 

दिग्दर्शन : पार्थ कुलकर्णी (प्रथम, मॉडर्न महाविद्यालय), तारा आराध्य (द्वितीय, रंगपंढरी) पुणे), आकाश संजय आवारे (तृतीय, आयएमसीसी). अभिनय : ईश्‍वर अंधारे (रंगपंढरी), महेश धायगुडे (मॉडर्न महाविद्यालय), अंजली कदम (रंगपंढरी), प्रिया मुळे (सप्तरंगी). दरम्यान, अभिनेते विजय पटवर्धन, अक्षय टंकसाळे यांना "विनोदवीर पुरस्कार', नरेंद्र वीर यांना "उत्कृष्ट रंगभूषाकार पुरस्कार', साहिल मरगजे याला "बालकलाकार पुरस्कार' प्रदान करण्यात आला. अनुपमा कुलकर्णी, विश्‍वास पांगारकर, संजय लोणकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. 

Web Title: pune news One-player competition