रुग्ण, तृतीयपंथीयांनाही पेन्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - संजय गांधी निराधार पेन्शन योजना पूर्वी फक्त विधवा, निराधार वृद्ध महिलांना मिळत होती. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता अपंग, अस्थिव्यंग, एड्‌स, कॅन्सरग्रस्त, पक्षाघात अशा दुर्धर आजारी रुग्ण, शरीरविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांनाही मासिक सहाशे प्रमाणे वर्षाला ७ हजार २०० रुपयांचे पेन्शन मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

ज्यांचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले.

तहसीलदार नागेश पाटील म्हणाले, ‘‘ही पेन्शन योजना फक्त विधवा महिलांसाठी आहे, असा गैरसमज आहे. या योजनेत सर्वसमावेशकता आणण्यासाठी सरकारने अपंग, अस्थिव्यंग, एड्‌स, कॅन्सरग्रस्त, पक्षाघात अशा दुर्धर आजारी रुग्णांसह शरीरविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांचा समावेश केला आहे. या सर्वांना मासिक ६०० रुपये प्रमाणे वर्षाला ७ हजार २०० रुपयांचे पेन्शन मिळणार आहे.’’

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांनादेखील याचा लाभ देण्याची तरतूद केली आहे, परंतु उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळे तो लाभ त्यांना दिला जाऊ शकत नाही. तसेच इयत्ता ८ ते १२ वी पर्यंतच्या अर्धवट शाळा सोडलेल्या शालाबाह्य मुला-मुलींनादेखील या पेन्शन योजनेत सामावून घेतले आहे. परंतु, या योजनेची माहिती लोकांपर्यंत न गेल्यामुळे लाभार्थींची संख्या मर्यादित आहे. याचे लाभधारक तहसीलदार कार्यालयात अर्ज भरू शकतात. विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्थांनी यामध्ये पुढाकार घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोचवावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

अशी आहे योजना...
 समाजातील आर्थिक दुर्बल, वंचित आणि निराधार व्यक्तीला आर्थिक साह्य म्हणून मासिक पेन्शन योजना आहे. 
 विधवा, घटस्फोटित, परितक्‍त्या महिलांसह अत्याचार पीडित महिला, अल्पवयीन मुली, अपंग, अस्थिव्यंग व्यक्ती, एड्‌सग्रस्त, कॅन्सरग्रस्त, पक्षाघात दुर्धर आजारी रुग्ण, शरीरविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीयांना घेता येणार लाभ.
 दारिद्र्यरेषेखालील (पिवळे रेशन कार्डधारक) तसेच वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेली व्यक्तीच योजनेसाठी पात्र.
 ज्या घरातील दोन व्यक्ती निराधार, आर्थिक दुर्बल आहेत, त्यांनाही एकत्र पेन्शन देण्याची तरतूद आहे.

Web Title: pune news Patients pensions