पेणच्या गणेशमूर्ती दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पुणे - यंदाच्या गणेशोत्सवासाठी पेण येथील श्री गणेशाच्या मूर्ती पुण्यात दाखल झाल्या आहेत. पारंपरिक सुबकपणा ही पेणच्या गणेशमूर्तींची वैशिष्ट्ये असून, यंदाही विविध रूपांमधील गणेशमूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई, जिलब्या मारुती, बाबू गेनू आदी प्रसिद्ध मूर्तींच्या प्रतिकृतींबरोबर पेशवाई, मयूर गणेश अशा रूपांमध्येही शास्त्रशुद्ध गणेशमूर्ती उपलब्ध असल्याचे ‘देसाई बंधू आंबेवाले’चे संचालक मंदार देसाई यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध मूर्तींची मागणी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहा इंचांपासून तीन ते चार फुटांपर्यंत अतिशय आकर्षक मूर्ती देसाई बंधूंच्या शनिपार, कोथरूड आणि बाणेर येथील दालनांमध्ये उपलब्ध आहेत. गणेश मूर्तींचे दर कलाकुसर, आखणी आणि सुबकपणावर अवलंबून असतात. यंदा गणेशोत्सव लवकर असल्याने कारागिरांनी मूर्तींचे रंगकाम लवकर संपवल्यामुळे गणेशमूर्ती उपलब्ध झाल्याचे देसाई यांनी सांगितले.