पेट्रोल- डिझेलचे दर पाहा "ऑनलाइन'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

पुणे - पेट्रोल- डिझेलचे दर शुक्रवार (ता. 16) पासून रोजच्या रोज बदलत असून, पेट्रोलियम कंपन्यांच्या संकेतस्थळावर हे दरपत्रक देण्यात येत आहे, त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने दररोजचे पेट्रोलचे दर पाहता येत असून, सकाळी सहा वाजता हे नवे दर लागू होत आहेत.

नव्या प्रणालीनुसार ग्राहक www.iocl.com या संकेतस्थळावर, तसेच 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून दर जाणून घेऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव दररोज बदलत असल्याने मोदी सरकारने पेट्रोल- डिझेलचे दर दररोज निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पेट्रोलचे दर दररोज जाहीर करण्यात येतील, असे सांगितले.

शुक्रवारी साध्या पेट्रोलचा दर 75.54 रुपये, डिझेल 58.58 रुपये आणि स्पीड पेट्रोलचा दर 78.27 रुपये होता. दरम्यान, उद्या शनिवारी (ता. 17) सकाळी सहा वाजल्यापासून साध्या पेट्रोलचा दर 77.52 रुपये, डिझेल 59.63 रुपये, स्पीड पेट्रोल 80.02 रुपये प्रतिलिटर असेल, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.