देहू रोडला मालगाडीवरून जाताना विजेच्या धक्‍क्‍याने तरुण गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पाणी भरण्यासाठी रेल्वे रूळाच्या पलिकडे गेलेला तरुणाने पाणी घेऊन परतताना मालगाडीवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र मालगाडीवर असलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला त्याचा स्पर्श झाला. यामध्ये तरुण 80 टक्के भाजला त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देहूरोड - पाणी भरण्यासाठी रेल्वे रूळाच्या पलिकडे गेलेला तरुणाने पाणी घेऊन परतताना मालगाडीवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र मालगाडीवर असलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला त्याचा स्पर्श झाला. यामध्ये तरुण 80 टक्के भाजला त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देहुरोड बाजारपेठेतील गुजरात फॅशन या कपड्याच्या दुकान कामगार मोहंमद हुसेन (वय 18) हा काम करतो. गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पाणी आणण्यासाठी देहुरोड स्थानकावरून रेल्वेरूळाच्या पलिकडे गेला. परतताना त्याने फलाटावर उभ्या असलेल्या मालगाडीवर चढून परतण्याचा प्रयत्न केला. मात्र वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला. बाजारपेठ ते डाकघर यादरम्यान गुरुवारी (ता 25 ) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. "उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने हुसेन बाजारपेठेतील रस्त्यावर फेकला गेला', अशी माहिती लोहमार्ग पोलिस आदवडे यांनी दिली.

■ मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:
 
■ आणखी ताज्या बातम्या वाचा: