नागरिकांची गैरसोय नको 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पुणे - शहरातील रस्ते पावसामुळे खराब होत असल्याने आता पुन्हा दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. मात्र ही कामे करताना पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच या कामांचा आठवडाभरात आढावा घेण्यात येईल, असेही प्रशासनाने सांगितले. 

दरम्यान, रस्त्यालगतच्या दुरुस्तीच्या कामामुळे टिळक रस्त्यावर पडलेला सिमेंटचा चिखल उचलण्यात आला. शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने काही भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यालगतच्या भागात पाणी साचत असल्याचे दिसून आले असून, त्यामुळे ऐन पावसात वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय, वाहने घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्यालगत पाणी साचू नये म्हणून, टिळक रस्त्यालगत सिमेंट टाकून रस्ता समान करण्यात आला. परंतु या कामानंतर पाऊस झाल्याने रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात सिमेंटचा 

चिखल झाला हेता. तो रस्त्यावर पसरल्याने वाहने घसरण्याच्या घटना घडल्या. त्यात एक तरुणी जखमी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्या ज्या रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. त्यांची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे नियोजन महापालिकेच्या पथ विभागाने केले आहे. त्यानुसार पावसामुळे खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. 

महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘रस्त्यांची पाहणी करून आवश्‍यक ती कामे करीत आहोत. पण ही कामे करीत असताना पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्या आहेत.’’

Web Title: pune news pmc Citizens