निवारा प्रकल्पासाठी आणखी चार संस्था 

निवारा प्रकल्पासाठी आणखी चार संस्था 

पुणे - शहरात रस्त्यांवर भीक मागणाऱ्या मुलांसाठी महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या निवारा प्रकल्पासाठी "रेनबो फाउंडेशन'ची नेमणूक केली असतानाही आणखी चार संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार उपसूचना देऊन सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी ही उपसूचना मांडली. 

भीक मागणाऱ्या सुमारे 10 हजार 427 मुलांसाठी महापालिका आणि हैदराबाद येथील "रेनबो फाउंडेशन'तर्फे "दिवस-रात्र' निवारा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली तेव्हा, रेनबो फाउंडेशनची नेमणूक केली होती; मात्र या प्रकल्पाला अंतिम मंजुरी घेण्यासाठी त्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत बुधवारी मांडण्यात आला. त्यानंतर उपसूचना देऊन प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

प्रस्तावावरील चर्चेदरम्यान रेनबो फाउंडेशनसह आणखी चार संस्थांचा समावेश करण्यात यावा, अशी उपसूचना भाजपचे सुनील कांबळे आणि मंजूषा नागपुरे यांनी केली. प्रकल्प राबविण्यासाठी संस्थांना पाच, तर रेनबो फाउंडेशनला तीन वर्षांची परवानगी द्यावी. फाउंडेशनकडे केवळ 1 हजार 750 मुले आणि उर्वरित मुले अन्य संस्थांकडे सोपविण्याची उपसूचनाही मंजूर करण्यात आली. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या बंद असलेल्या 18 शाळांचा वापर करण्यात येणार आहे. त्यात मुलांच्या निवासासाठी आवश्‍यक अशा पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी नेमलेल्या संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com