पीएमपी कर्मचाऱ्यांना एका दिवसांत 9 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे - पीएमपीमध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रॅच्युटी वाटपाची तब्बल 304 प्रकरणे प्रशासनाने निकालात काढली असून, त्यातंर्गत 9 कोटी 87 लाख रुपयांचे कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. तसेच या पुढे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी सर्व प्रलंबित देणी देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे. 

पीएमपीमध्ये 2013 ते 2017 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळालेली नव्हती. त्यासाठी संबंधित कर्मचारी, कर्मचारी संघटना प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत होत्या. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि ग्रॅच्युटीची प्रकरणे निकालात काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर यांच्या हस्ते 304 कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम नुकतीच प्रदान करण्यात आली. तसेच आगामी काळात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशीची भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युटीची रक्कम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पीएमपीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रॅच्युटीची रक्कम मिळाल्यामुळे कर्मचारी, कामगार संघटनांनी प्रशासनाचे स्वागत केले आहे. तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या 42 प्रकरणांवरही तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.