पीएमपी वाहक-चालकाचा प्रामाणिकपणा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे: पीएमपी बसमध्ये प्रवाशाचे पैशांसह पडलेले पाकिट परत करत वाहक व चालकाने प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. यामुळे प्रवाशांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.

पीएमपीची बस रावेत बस थांबा येथून शिवाजीनगरकडे येत होती. दरम्यानच्या काळात एका प्रवाशाचे पैशांचे पाकीट बसमध्ये पडले होते. पाकिटामध्ये रोख साडे आठरा हजार रुपये व विविध बॅंकांची कार्ड होती. बस वाहक विजय सुरेश आयरे व चालक फिरोज इस्माईल शेख यांनी पाकिटातील कागदपत्रांतून मोबाईल क्रमांक मिळवत प्रवासी विजय त्रिंबकराज छाजेड (रा. श्रीरामपूर, नगर) यांच्याशी संपर्क साधला.

छाजेड हे शिवाजीनगरला आल्यानंतर आधिकाऱयांच्या हस्ते रोख रक्कमेसह पाकिट त्यांना परत केले. यावेळी छाजेड यांनी वाहक व चालकाचे आभार मानत बक्षिस म्हणून हजार रुपये दिले. शिवाय, पीएमपी कर्मचाऱयांमुळे प्रवाशांमुळे पैशांसह महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचे सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पीएमपीच्या कर्मचारय़ांमुळे प्रवाशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :