म्हाळुंगे गावात पीएमआरडीएचे कार्यालय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पुणे - अहमदाबाद आणि सूरत नगररचना योजनेच्या धर्तीवर "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'कडून (पीएमआरडीए) 291 हेक्‍टरवर "म्हाळुंगे-माण नगररचना' योजना राबविण्यात येत आहे. ही योजना वेगाने कार्यान्वित व्हावी, तसेच नागरिकांच्या अडचणींची जागेवरच सोडवणूक व्हावी, यासाठी म्हाळुंगे गावात "पीएमआरडीए'चे स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीच्या पर्यायी रस्त्यासाठी म्हाळुंगे येथे 291 हेक्‍टर जागेवर नगररचना (टाउन प्लॅनिंग स्कीम) योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेचा प्रारूप आराखडा व नकाशे तयार करण्यापूर्वी स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यात येणार आहे. दीड महिन्यात योजनेचा मसुदा तयार होणार असून, तो मंजूर करण्याचे अधिकार "पीएमआरडीए'ला आहेत. ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरीस प्राधिकरणाची सभा घेऊन मसुद्याला मंजुरी देण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण करून भूसंपादन प्रक्रिया केली जाणार असून, यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी जानेवारी महिना उजाडणार आहे. वेगाने प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी म्हाळुंगे गावात तात्पुरते कार्यालय सुरू करण्याबरोबरच नगररचना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबदल्यात विकसित जमीन, टीडीआर
म्हाळुंगे टीपी स्कीममध्ये सर्व जमीन एकत्रित करून रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्था अशा पायाभूत सुविधांची उभारणी केली जाईल. मूळ जमीनधारकांना विस्थापित न करता एकूण जमिनीपैकी 50 टक्के विकसित जमीन देण्यात येणार आहे. तसेच मोबदला म्हणून बांधकामासाठी "संपूर्ण चटई क्षेत्र निर्देशांक' (एफएसआय) तसेच जमीन नको असणाऱ्यांना "हस्तांतरीय विकास हक्क' (टीडीआर) दिले जाणार असून, यासाठी प्राधिकरणाकडून 250 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

Web Title: pune news pmrda office in mahalunge village