मिनी हॉस्पिटल पोलिसांसाठी अतिशय स्तुत्य उपक्रम - पोलिस आयुक्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे - मिनी हॉस्पिटल हा पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि गणेशभक्तांसाठी राबविण्यात येणारा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, अशा शब्दात पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 

पुणे - मिनी हॉस्पिटल हा पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि गणेशभक्तांसाठी राबविण्यात येणारा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, अशा शब्दात पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे सुरू केलेल्या मिनी हॉस्पिटलचे उद्‌घाटन शुक्‍ला यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. अपर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट, डॉ. अनंत बागूल, महेश नागरी मल्टी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष धनराज राठी, मगराज राठी, पारख फार्मास्युटिकल्सचे संदीप पारख, दगडूलाल बाहेती, ब्रह्मानंद लाहोटी, अजय झंवर, जगदीश मुंदडा आदी उपस्थित होते. हे उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. 

राठी म्हणाले, ""गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांची तसेच गणेशभक्तांची काळजी घेणे अतिशय आवश्‍यक आहे. अनेकदा गर्दीच्या वेळेत वैद्यकीय मदत रुग्णापर्यंत पोचण्यास विलंब होतो. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी मोफत वैद्यकीय सेवा निरंजन सेवाभावी संस्थेमार्फत पुरविण्यात येत आहे. यामुळे पुण्याचा गणेशोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडेल.'' 

डॉ. बागूल म्हणाले, ""मिनी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे, इंजेक्‍शन, सलाईन, अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. महिलांकरिता स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरिता सर्व यंत्रणेसह डॉक्‍टर व परिचारिकांचे पथक सज्ज आहे. हा उपक्रम गणेशोत्सवात बारा दिवस शुक्रवारपासून (ता. 25) गणेश विसर्जनापर्यंत सुरू राहणार आहे. हॉस्पिटलजवळ रुग्णवाहिकादेखील सज्ज असणार आहे. 

पुणे

पुणे - बाजीराव रस्त्यावर पोलिस वाहतूक शाखेने "नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, जेथे फलक लावले तेथेच बेशिस्त चालक वाहने...

06.03 AM

पुणे - "स्मार्ट सिटी', "स्मार्ट मोबिलिटी' आणि "इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) या क्षेत्रातील स्टार्टअप्सला तंत्रज्ञानासह सर्व...

05.21 AM

पुणे - शहरातील ‘प्रीमियम’ (मोक्‍याची जागा) व्यावसायिक मालमत्तांची उपलब्धता आणि ती मिळण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे...

05.00 AM