वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करणार - ताकसांडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील 16 लाखांहून अधिक ग्राहकांकडे 235 कोटी रुपयांची थकबाकी आहे. परिणामी, वीजबिलांची वसुली करण्याशिवाय महावितरणला पर्याय नाही. त्यामुळेच थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करावी, अशा सूचना प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यात सात लाख 80 हजार वीजग्राहकांकडे 151 कोटी 17 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख 28 हजार वीजग्राहकांकडे 18 कोटी 87 लाख, सांगली जिल्ह्यातील एक लाख 98 हजार ग्राहकांकडे 19 कोटी 59 लाख, सातारा जिल्ह्यात दोन लाख 12 हजार ग्राहकांकडे 17 कोटी 57 लाख तसेच, सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख 63 हजार ग्राहकांकडे 27 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. 

ताकसांडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून थकबाकीबाबत नाराजी व्यक्त केली. तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी थकबाकीदारांनी त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.