पुणे विमानतळावर प्रवाशाकडून तीन किलो सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे - दुबईहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून सीमाशुल्क विभागाने रविवारी तीन किलो सोने जप्त केले. या सोन्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाशाला न्यायालयाने 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

एअर इंडियाच्या विमानाने दुबई येथून पुणे विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाबाबत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्याच्या बॅगची झडती घेतली असता बॅगेत तीन रेडियम प्लेटेड सोन्याच्या वायर, सोन्याची सात बिस्किटे आणि 59 प्लेट असे एकूण तीन किलो 159 ग्रॅम सोने आढळून आले. हे सर्व 24 कॅरेटचे सोने प्रवासी बॅगेच्या आतील बाजूस इमर्जन्सी लाइटमध्ये आणि छोट्या डिजिटल ऍम्लिफायरच्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये लपवून ठेवले होते. प्रवाशाकडून हे सोने घेऊन जाण्यासाठी विमानतळावर आलेल्या व्यक्‍तीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 

प्रवाशाने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी आरोपीला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्‍त मनीष दुदपुडी यांनी दिली. 

टॅग्स