पुणे अंधशाळेतील दृष्टिहीन मुलांची 'फटाके मुक्त दिवाळी'

संदीप जगदाळे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

हडपसर (पुणे): कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील दृष्टिहीन मुलांनी 'फटाके मुक्त दिवाळी' व 'प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प करून दिवाळी पार्टी साजरी केली. ही पार्टी आयनोटिक्स फांउडेशन तर्फे आयोजन करण्यात आले होते. फांउडेशतर्फे मुलांना दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले. दृष्टिहिन मुलांनी 'फटाके मुक्त दिवाळी' व 'प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. या अहवानाला प्रतिसाद देत फांउडेशनच्या कार्यकर्त्यांनी देखील या संकल्पात सहभागी होण्याची शपथ घेतली. याप्रसंगी दृष्टिहीन विदयार्थ्यांनी वादयवृंद सादर केला. त्यामुळे दिवाळी पार्टीला अधिक रंगत आली.

याप्रसंगी पुणे अंधशाळेचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, फाउंडेशनचे सीएसआर प्रमुख जर्नादन राव, सीएसआर संचालक विदया दुराई, समनव्यक विजय कुरियन, रावेंद्र चचाणे, स्वप्नील नेमाडे, आशिष कौल व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेवाळे म्हणाले, 'विद्यार्थ्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून प्रदूषण करून स्वतःचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. फटाक्यामुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण, अपघात, करोडो रुपयाचा चुराडा व पर्यावरणाचा ऱ्हास होतो. विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करून पैशांची बचत करावी आणि वाचविलेल्या पैशातून चांगली पुस्तके, खेळणी, भेटवस्तू, मिठाई, गरिबांच्या घरी फराळ देउन, त्यांना आर्थिक, शैक्षणिक मदत करणे या सारखी सामाजिक कामे करावीत. फक्त दिवाळीतच नाही तर वेगवेगळ्या धर्मातील सणांच्या दिवशी, निवडणुका, मिरवणूक व नेत्यांचे वाढदिवस यावेळी फटाके फोडून प्रदूषण करता कामा नये. विदयार्थ्यांनी फटाक्यांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करावी. फटाके विरोधी अभियानाला शासनाचे साथ दिल्याने शासनाचे अभिनंदन करायला हवे.'