VIDEO : पुणे शहरात मुसळधार पाऊस; वाहतूकीचा खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

पुणे : आज संध्याकाळी पुणे शहरात मुसळधार जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा, रस्त्यावर पाण्याचे तळे असे चित्र आढळून आले.

पुणे : आज संध्याकाळी पुणे शहरात मुसळधार जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा, रस्त्यावर पाण्याचे तळे असे चित्र आढळून आले.

तळेगाव दाभाडेतही पाऊस
पुणे शहरासह तळेगाव दाभाडेतही आज संध्याकाळी अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले आणि वाहनचालकांची तारांबळ उडाली.