'महपालिका हद्दीलगतची 34 गावे टप्प्याटप्प्याने महापालिकेत'

ज्ञानेश सावंत
बुधवार, 21 जून 2017

पुणे : महपालिका हद्दीलगतची 34 गावे टप्प्याटप्प्याने महापालिकेत सामावून घेण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, यासंदर्भातील सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर ते निर्णय घेतील, असेही सांगण्यात आले आहे.

हद्दीलगतची गावे महापालिकेत घेण्याबाबत हवेली तालुका कृती समितीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही गावे सामावून घेण्याबाबत येत्या तीन आठवड्यात निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर बापट यांच्यासमवेत मुंबईत बुधवारी बैठक झाली. पुण्यातील आमदारांसह, राज्य सरकार आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गावे सामावून घेण्याबाबत लोकप्रनिधी आणि अधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. गावे घेण्यासंदर्भात दोन वेगवेगळी मतप्रवाह बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला. मात्र, ही गावाने टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेतली जाईल, असे बापट यांनी बैठकीनंतर सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.