"पुणे पेट्रोल डीलर'चा बंदमध्ये सहभाग नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

पुणे - पुणे पेट्रोल डीलर असोसिएशन पेट्रोल खरेदी बंदच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, असे संघटनेचे अध्यक्ष समीर लडकत यांनी कळविले आहे.

पुणे - पुणे पेट्रोल डीलर असोसिएशन पेट्रोल खरेदी बंदच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, असे संघटनेचे अध्यक्ष समीर लडकत यांनी कळविले आहे.

विविध मागण्यांसाठी "एआयपीडीए' या संघटनेने 5 जुलै रोजी पेट्रोल डिझेल खरेदी बंदचे आंदोलन पुकारले आहे. 12 जुलैपासून बेमुदत खरेदी बंदचा इशाराही या संघटनेने दिला आहे. या संघटनेशी संलग्न असलेले दि पूना पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सदस्य सहभागी होणार आहे. पुणे पेट्रोल डीलर असोसिएशन मात्र या आंदोलनात सहभागी होणार नाही. आमची संघटना ही नोंदणीकृत संघटना असल्याचा दावा लडकत यांनी करीत, ही संघटना महाराष्ट्रातील "एफएएमपीईडीए' या संघटनेशी संलग्न आहे.

दररोज बदलणाऱ्या भावामुळे पेट्रोल पंप चालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी संघटना कायदेशीर लढा देत आहे. केंद्रीय मंत्र्यांनीदेखील तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांचे नुकसान टाळण्यासाठी सूत्र ठरवावे, अशा सूचना दिल्या आहेत. कमिशन वाढवून देण्याचे आश्‍वासन यापूर्वीच दिले गेले आहे, असे त्यांनी कळविले आहे.