पुण्यात पोलिस पट्रोलिंगमध्ये दुचाकीसह चोरटयास पकडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक पी. एम. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी सचिन पवार व वैभव हिलाळ हे गाडीतळ येथे कर्तव्य बजावत होते. 

हडपसर : वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याने पट्रोलिंग करत असताना चोरीच्या दुचाकीसह एका चोरटयास पकडले. मुंबई येथील समतानगर पोलिस ठाण्यात ही दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार २० मे रोजी देण्यात आली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या चोरावर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात मारामारी व चोरीचे २० गुन्हे दाखल आहे. त्याला नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहरातून तडीपार केलेले आहे. 

योगेश बाबुराव वाघमारे (वय २४, रा. गंगानगर, फुरसुंगी, मुळ गाव, कांदवली, मुंबई) असे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरटयाचे नाव आहे. वाहतूक विभागाचे पोलिस निरिक्षक पी. एम. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी सचिन पवार व वैभव हिलाळ हे गाडीतळ येथे कर्तव्य बजावत होते. 

यावेळी संशय आल्याने वाघमारे याला थांबवून गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने दुचाकी चोरली असल्याची कबुली दिली.