पुणे विद्यापीठामध्ये आता आहारशास्त्र अभ्यासक्रम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पुणे, - बदलत्या जीवनशैलीमुळे मनुष्याची आहारपद्धती बदलली आहे. यामुळे माणसाला वेगवेगळे आजार जडू लागले आहेत. आहारशास्त्राची योग्य माहिती लोकांना समजावी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहारशास्त्रासंबंधी अल्पमुदतीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. 

याबाबत आरोग्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, "आहारशास्रासंबंधी अशाप्रकारचा अभ्यासक्रम देशात प्रथमच होत आहे. आरोग्यशास्त्र शाखेचे विद्यार्थी, आहार पद्धतीचे अभ्यासक यासाठी प्रवेश घेऊ शकतील. सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम असले. पुढील आठवड्यात प्रवेशाची अधिसूचना जारी करण्यात येणार असून 25 जणांना प्रवेश देण्यात येईल.'' 

आरोग्यशास्त्र विभागात कर्करोग आणि संधीवात दुर्धर आजारांवरील औषधांचे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी पूरक औषधांचे (ऍडज्युअंट) संशोधन सुरू आहे. याबद्दल डॉ. पटवर्धन म्हणाले, ""कर्करोगावर उपचार करताना केमोथेरपी केल्यास केस गळणे आदी दुष्परिणाम होतात. ते टाळण्यासाठी तसेच आजारांवरील लसींना सबळ करण्यासाठी पूरक औषधांवर संशोधन विद्यापीठात सुरू आहे. ते आता चाचणीच्या टप्प्यावर आले आहे.''