कमी पैशात रेल्वे बरी

कमी पैशात रेल्वे बरी

पुणे - एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय स्वीकारला असून, गेल्या तीन दिवसांत रेल्वे गाड्यांच्या गर्दीमध्ये वाढ झाली आहे. एसटीचा संप आणि खासगी वाहतूकदारांकडून केली जाणारी लूट यामुळे पुण्याहून प्रामुख्याने सोलापूर, मुंबई, नाशिक, नांदेड या भागांत जाणाऱ्या नागरिकांनी रेल्वे प्रवास सोयीचा ठरत आहे. खासगी गाड्यांनाही सध्या प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे कमी पैशात रेल्वेची गर्दी परवडली, अशी भूमिका प्रवाशांनी घेतल्याने रेल्वेला गर्दी वाढली आहे. रेल्वे स्टेशनवर गुरुवारी पादचारी पूल आणि फ्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली होती.

सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, तुळजापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी दररोज पुणे स्टेशन येथून रेल्वे गाडी उपलब्ध आहे. ही गाडी गर्दीने भरून धावत आहे. नागपूर एक्‍स्प्रेस, पुणे-अमरावती एक्‍स्प्रेस या गाड्यांमुळे विदर्भ, मराठवाड्यातील प्रवाशांना चांगला पर्याय मिळाला आहे. मात्र, ऐनवेळी आलेल्या प्रवाशांना जनरल तिकीट काढून गर्दीमध्ये प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने एसटी संपाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक गाड्यांना जनरल डबे वाढविले आहेत. त्यामुळे जास्त संख्येने प्रवासी जाऊ शकत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com