पावसाच्या सरींची  आजही शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पुणे - शहर आणि परिसरात येत्या गुरुवारी (ता. 21) पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने बुधवारी व्यक्त केली. शहरात बुधवारी दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 12 मिमी पावसाची नोंद झाली. 

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. बुधवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सातत्याने पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहू लागले होते. सकल भागात पाणी साचले तर, पाटील इस्टेट झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. कोथरूड, पाषाण, बाणेर, पटवर्धन बाग, कर्वेनगर या परिसरात झाडाच्या पंधरा फांद्या पडल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. 

कमाल तापमानाचा पारा सात अंश सेल्सिअसने कमी झाला असून, 23.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.