विविध संस्था-संघटनांतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - विविध संस्था-संघटनांतर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे कॉंग्रेस भवन येथे अभिवादन सभा घेण्यात आली. रवींद्र म्हसकर यांनी गीते सादर केली. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, गोपाळ तिवारी, चंदू कदम, सुजाता शेट्टी, लता राजगुरू उपस्थित होते. 

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील गांधी यांच्या पुतळ्यास महापालिकेतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, डॉ. राजकुमार जाधव, आबा जगताप, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी उपस्थित होते. या प्रसंगी अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या नेत्या कमलताई व्यवहारे, खडकवासला कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय अनायसे, गांधी विचार मंचाचे संकेत मुनोत यांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. 

पुणे शहर युवक कॉंग्रेसतर्फे आयोजित शिबिरात सुमारे 527 जणांनी रक्तदान केले. डॉ. कदम यांनी रक्तदान करून शिबिराची सुरवात केली. युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास लांडगे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, संतोष पाटोळे, हनुमंत पवार उपस्थित होते. 

खडकवासला कॉंग्रेस समितीतर्फे धायरी येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र कॉंग्रेस समितीचे सदस्य श्रीरंग चव्हाण-पाटील यांच्या हस्ते गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुणे शहर कॉंग्रेस क्रीडा सेलचे उपाध्यक्ष धनंजय पाटील, हवेली तालुका सरचिटणीस शंकर दांगट, मिलिंद पोकळे, राहुल मते, साहेबराव मते, अंबादास बिरादार आदी उपस्थित होते. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना फळांचे वाटप केले. 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांच्या वतीने सेनापती बापट पुतळा ते वसंतदादा पुतळ्यापर्यंत सद्‌भावना ज्योत यात्रा काढण्यात आली. बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते ही सद्‌भावना ज्योत प्रज्वलित करण्यात अली. बाळासाहेब लांडगे, सुरेश नांगरे, अभय छाजेड, मोहन जोशी उपस्थित होते.

Web Title: pune news Rajiv Gandhi