ईद मुबारक, भाईजान ईद मुबारक.... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पुणे - सामूहिक नमाज पठण... देशाच्या शांतता, सुख आणि समाधानासाठी अल्लाहची दुँआ... एकमेकांना आलिंगन घ्यायचे आणि नातेवाईक, मित्र-मैत्रिणींसमवेत भोजनासह शिरखुर्म्याचा आस्वाद घ्यायचा, मुस्लिम धर्मीयांच्या घरी रमजान ईदच्या दिवशी हे आनंदोत्सवाचे दृश्‍य पाहायला मिळते. ईदच्या निमित्ताने मशिदींवरही आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, रविवारी (ता. 25) मुस्लिम धर्मीयांनी सुकामेव्यासहित, गृहसजावटीच्या वस्तूंचा आणि नवे कपडे खरेदीचा आनंद घेतला. 

चंद्र दर्शन झाले की रमजान ईद साजरी करण्यात येते. सोमवारी (ता. 26) रमजान महिन्यातील तिसावा रोजा आहे. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मीय नागरिक नव्या गाड्या, घरे व गृहोपयोगी वस्तूंही खरेदी करतात. त्यामुळे गृहोपयोगी वस्तूंच्या बुकिंगसाठी बाजारपेठेतील दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती. कौटुंबिक जिव्हाळ्याचा सण असल्याने अनेकजण तो एकत्र येऊन साजरा करतात. विविध धर्मीय नागरिकही उत्साहाने त्यात सहभागी होतात. शहर व उपनगरांतील मशिदींमध्ये ईदची तयारी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दिवशी मोठी माणसांकडून लहानग्यांना ईदी (बक्षीस) देण्याची देखील प्रथा आहे. 

शिरखुर्म्यासाठी शेवया, बदाम, पिस्ता, खारीक, खोबरे, काजू, चारोळी, खसखस, वेलदोडे, केशर इत्यादींच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. तसेच सुरमा, मेहंदी, बांगड्या आणि विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ्यांच्या खरेदीसाठी कॅम्प भागातील शिवाजी मार्केट, कोंढव्यातील कौसरबाग, घोरपडे पेठेतील मोमीनपुरा येथील स्टॉल्समध्ये महिलांची गर्दी झाली होती. कुरआनच्या विविध भाषेतील प्रती, "आयत'च्या तसबिरी, नाना तऱ्हेच्या टोप्या व कपडेही नागरिक खरेदी करत होते.

टॅग्स