'रिलायन्स इन्फ्रा'पुढे प्रशासनाचे लोटांगण !

'रिलायन्स इन्फ्रा'पुढे प्रशासनाचे लोटांगण !

पुणे - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील पुणे-बंगळूर महामार्गाचा देहू ते सातारा हा टापू एकूण १४० किलोमीटरचा आहे. या महामार्गाचे काम केंद्र सरकारने ‘रिलायन्स इन्फ्रा’ या कंपनीला ‘डिझाइन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्स्फर’ (डीएफबीओटी) तत्त्वावर दिला आहे. त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात ‘सबकॉन्ट्रॅक्‍ट’ नेमून त्यांना कामे दिली आहेत. त्यांच्याकडून संथगतीने सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम यामुळे शेकडो नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. मात्र ‘एनएचएआय’कडून संबंधितांवर कोणतीच ठोस कारवाई केली गेली नाही. त्यामुळे ‘रिलायन्स इन्फ्रा’पुढे प्रशासन हतबल असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.

सुरक्षिततेसाठी उपाययोजना
रासायनिक कोटिंग (पिचिंग)
घाटात ‘सहा बाय चार’ फुटी गटारलाइन  
नारंगी रंगाच्या त्रिकोणी कोन आणि साखळ्या
दुभाजक म्हणून रंगीत पिंप, अडथळे
रम्बलर स्ट्रीप्स किंवा रबरचे स्पीड रिटार्डर्स
उंच ‘पेव्हमेंट मार्कर’
पोर्टेबल दिशा आणि माहितीदर्शक फलक
विद्युतपुरवठा नसलेल्या ठिकाणी सौरऊर्जेचे दिवे, दिशादर्शक
हिरव्या आणि लाल ‘एलईडी बॅटन’
नारंगी रेडियमचे छोटे खांब (स्प्रिंग पोस्ट)
बहिर्वक्र आणि अंतर्वक्र गोल मोठे आरसे
परावर्तित दिशादर्शक, माहिती फलक
उड्डाण पुलाच्या खालून भुयारी मार्ग (अंडरपास) 
गावे जोडणाऱ्या भागांमध्ये दुतर्फा सेवारस्ते

कात्रज घाटातील रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करणे
खंबाटकी घाटातील रुंदीकरण वेगाने पूर्ण करावे
दरडींना लोखंडी जाळ्या आणि पिंचिंगचे मजबुतीकरण
घाटामध्ये पंखे व विद्युत दिव्यांना अखंडित वीजपुरवठा 
ओढ्यांवर उच्च दर्जाचे सिमेंट काँक्रिटचे पूल, कल्वर्ट 
जुन्या पुलांचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करावे, गरजेनुसार नव्या पुलांची उभारणी 
रम्बलरची जाडी वाढविणे जेणेकरून ट्रक, खासगी बसना हादऱ्यांद्वारे पूर्वसूचना मिळेल
तात्पुरत्या धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक, अडथळे उभारावेत
महामार्गांच्या दुतर्फा ‘मेटल बीम’ उभारावेत
दर दहा किलोमीटरवर महामार्ग पोलिस मदत केंद्र
टोल नाक्‍यांशिवाय अन्यत्र सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा 
हॉटेलचे पार्किंग महामार्गाच्या बाजूला खुल्या मैदानांमध्ये सुरू करावे
हमखास अपघातांच्या क्षेत्रांवर (ब्लॅक स्पॉट) रम्बलर उभारावेत


अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेसंदर्भात रिलायन्स कंपनीचे अधिकारी, महामार्ग पोलिस व प्रशासन यांच्या बैठका घेऊन प्रस्तावित उड्डाण पुलांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. महामार्गांवरच्या सुरक्षिततेसाठी ‘थर्मल प्लॅस्टिक पेंट’चे दिशादर्शक फलक, महामार्गांच्या दुतर्फा ‘मेटल बीम’, संरक्षक कठडे बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु या उड्डाण पुलांना ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे अडचणी येत आहेत. भूसंपादन, मोबदला, पुलाची लांबी, आराखड्यावरून मतभेद आहेत. नीरा नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, कृष्णा नदीवरील पुलाचे काम प्रस्तावित आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून कामाचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.
- सुहास चिटणीस,  प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  (एनएचएआय) 

प्रशासनाने  ही दक्षता घ्यावी 
वाहतूक व्यवस्थापन सुरक्षा
बांधकाम व रचना सुरक्षा
यांत्रिक, विद्युत आणि अग्निरोधक सुरक्षा
कामगार, नागरिकांची सुरक्षा

कात्रज नवीन बोगदा ते देहू रस्ता बायपास ३४ किलोमीटरचा महामार्ग 
 गेल्या सहा वर्षांमध्ये १ हजार २४९ अपघात, ५१७ जण मृत्युमुखी (३१ ऑक्‍टोबर २०१७ अखेर)
 वर्षनिहाय अपघातांची संख्या ः २०१२ वर्षात २१६, २०१३ मध्ये २०९, २०१४ मध्ये २०७, २०१५ मध्ये २१६, २०१६ मध्ये २१८
 कात्रज बोगदा १३, दरीपूल ९, वारजे मुठा पूल ११, मंगेशकर हॉस्पिटलनजीक २६, डुक्करखिंड १४, वडगाव पूल ११, नवले पूल १० असे एकूण ९४ ‘ब्लाइंड स्पॉट’ आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com