घरफोडीच्या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

पुणे - शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, त्यात लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे. गेल्या दोन दिवसांत येरवडा परिसरातील कल्याणीनगर, हडपसर येथील घुले वस्ती आणि स्वारगेट येथील पर्वती पायथा परिसरात चोरट्यांनी घरफोड्या करून मौल्यवान दागिने आणि लाखोंचा ऐवज चोरी केला. 

कल्याणीनगर येथील नेपच्यून सोसायटीमधील फ्रान्सिस बरोटो (वय 40) यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा चार लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. त्यांच्या शेजारील फ्लॅटमधील फराहा शेख राजस्थान येथे गेल्या आहेत. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरातून ऐवज लंपास केला. तसेच वडगावशेरी येथील न्याती मिडोज सोसायटीमधील टी. श्रीनिवासन यांच्या घरातूनही चोरट्यांनी ऐवज लांबविला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

हडपसर परिसरात महादेवनगर येथील बंद फ्लॅटमधून चोरट्यांनी शुक्रवारी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. याप्रकरणी बालाजी गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, स्वारगेट परिसरात पर्वती पायथा येथील एका घरातून चोरट्यांनी पावणेदोन लाखांचे दागिने आणि रोकड चोरी केली. याबाबत कुंदा परदेशी यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: pune news Robbery