सरकारचे तोंड शेतकऱ्यांकडे वळविले - खोत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पुणे - ""शेतकऱ्यांना सन्मानाने उभे करायचे असून, सरकारचे तोंड शेतकऱ्यांकडे वळविण्याचे काम आम्ही केले,'' असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. 

राज्यात पहिला शेतकरी आठवडे बाजार कोथरूड येथे कृषी पणन मंडळ आणि श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीने सुरू केला आहे. या बाजाराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी हे होते. भाजपचे प्रसाद लाड, आमदार मेधा कुलकर्णी, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे नरेंद्र पवार, अमोल गोरे आदी या वेळी उपस्थित होते. 

खोत म्हणाले, ""गेल्यावर्षी राज्य सरकारने फळे व भाजीपाला विनियमन रद्द केल्याने शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळाली. त्यासाठी सरकारने संतशिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान सुरू केले. यामुळे शेतकऱ्यांना मुंबई, पुणे या मोठ्या शहरांत बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.'' कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या याविषयी ते म्हणाले, ""शेतकऱ्यांना भीक नकोय. घाम गाळणारा शेतकरी जगविणे गरजेचे आहे. त्यांना सन्मानाने उभे करावयाचे आहे. शेतीमालाची विपणन व्यवस्था मजबूत झाली, तर शेतकरी मजबूत होईल आणि तो आत्महत्या करणार नाही.'' 

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त करत डॉ. सप्तर्षी म्हणाले, ""शेतीमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांचा प्रपंच चालतो, त्याला योग्य भाव मिळाला नाही, तर शेतकरी कर्जबाजारी होईल, त्यामुळे कर्जमाफी गरजेची आहे.' प्रास्ताविक नरेंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन सचिन गोरडे यांनी केले. गणेश सवाणे यांनी आभार मानले.

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते...

04.18 PM

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM