अखेर सहदुय्यम निबंधक कार्यालय सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे - भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) "फायबर ऑप्टिक केबल' जोडणी खंडित झाल्यामुळे कर्वे रस्त्यावरील काकडे सिटी येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज पूर्णतः ठप्प झाले होते. या संदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत "बीएसएनएल'कडून "केबल' जोडणी करून दूरध्वनी आणि इंटरनेट सुविधा शुक्रवारी पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे आजपासून जमीन, सदनिका खरेदी-विक्री व्यवहार सुरू झाले आहेत. 

काकडे सिटी येथील स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा केला जात होता. या संदर्भात बीएसएनएलचे अधिकारी गोसावी यांना संपर्क साधला असता, त्यांनी केबल जोडणी करून सेवा सुरू केली असल्याची माहिती दिली. दरम्यान, राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क संचालनालयाकडूनही दखल घेण्यात आली असून, त्यांनी दुय्यम निबंधकांकडून "बीएसएनएल'सोबत कार्यालयीन पत्रव्यवहार केल्याबद्दलचा लेखी अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. 

Web Title: pune news sakal BSNL

टॅग्स