‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१७’ उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या अभ्यासासाठी उपयुक्त 

स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या अभ्यासासाठी उपयुक्त 
पुणे - विविध स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त असलेले ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१७ (भाग २)’ हे त्रैमासिक आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. चालू वर्षातील एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांतील राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, पर्यावरण, विज्ञान व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घटना-घडामोडींची माहिती सामान्य ज्ञानाच्या विशेष नोंदीसह देणारे हे त्रैमासिक केंद्र व राज्य लोकसेवा आयोगामार्फत आगामी काळात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. 

परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्‍नसंचाचा समावेश असलेल्या या त्रैमासिकाचे मूल्य १२५ रुपये असून, ते महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे व ‘सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांच्या कार्यालयांत उपलब्ध आहे. 

भाग २ मधील विशेष नोंदी 
वस्तू आणि सेवाकर, श्रीनगर जीएसटी विशेष परिषद, इमॅन्युअल मॅक्रॉन यांची फ्रान्सच्या व मून जे इन यांची दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी, ओबोर परिषदेवर भारताचा बहिष्कार, सीरियात सर्वांत मोठा रासायनिक हल्ला, ‘ब्रेक्‍झिट’ विधेयक ब्रिटन संसदेत मंजूर, पूर्णिमा बर्मन आणि संजय गुब्बी यांना ग्रीन ऑस्कर, बी. साईप्रणित सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजेता, बैलगाडा शर्यत परवानगी विधेयक, भिलार (जि. सातारा) हे भारतातील पहिले पुस्तकाचे गाव, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित पाच प्रेरणास्थळे पंचतीर्थ म्हणून घोषित.

‘सकाळ प्रकाशना’ची पुस्तके ऑनलाइन खरेदी करायची असल्यास www.sakalpublication.comwww.amazon.in येथे लॉग इन करावे. अधिक माहितीसाठी संपर्क - ०२०-२४४०५६७८ किंवा ८८८८८४९०५० (सकाळी १० ते सायंकाळी ६).