‘सकाळ फेस्टिव्हल’मध्ये आजपासून खरेदीची धमाल

‘सकाळ फेस्टिव्हल’मध्ये आजपासून खरेदीची धमाल

पुणे - गेली वीस वर्षे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा खरेदीचा महोत्सव ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ आजपासून (ता. २४) पासून सुरू होत आहे. शॉपिंग करणे हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ घेऊन येत आहेत, आपले घर व घरातील प्रत्येकासाठी खरेदीची सुवर्ण संधी.

कमी किंमतीत, नवनवीन दर्जेदार उत्पादने आणि भरघोस सवलतींचा पाऊस हे या शॉपिंग फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य. कॉस्मेटिक्‍स, ज्वेलरी, गिफ्टस, टॉईज, फर्निचर आणि होम डेकॉर, गारमेंट्‌स, फूड प्रॉडक्‍ट्‌स, नॉव्हेल्टीज, होम अप्लायन्सेस, फर्निचर, इंटेरियर, वेगवेगळे खाद्य पदार्थ, गिफ्ट्‌स यांचे अधिकाधिक स्टॉल्स खरेदीप्रिय पुणेकरांना सहज व एक छताखाली उपलब्ध होणार आहेत.

फेस्टिव्हलला वीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महिला, ज्येष्ठ नागरिक, सैन्यदलातील व्यक्ती तसेच ‘सकाळ मधुरांगण’, ‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’, ‘सकाळ-एनआयई’ आणि ‘यंग बझ’च्या सभासदांना मोफत प्रवेश असेल.

सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल-२०१७
कोठे : ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, सिंचननगर, 
रेंजहिल्स, शिवाजीनगर
केव्हा : २४ ते २८ नोव्हेंबर
कधी : सकाळी ११ ते रात्री ९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com