उद्यापासून करा मनसोक्त खरेदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो’मध्ये दोनशेहून अधिक स्टॉल्स

पुणे - पुणेकरांना मनसोक्त आणि वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा म्हणून ‘सकाळ’तर्फे ‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. 

‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो’मध्ये दोनशेहून अधिक स्टॉल्स

पुणे - पुणेकरांना मनसोक्त आणि वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा म्हणून ‘सकाळ’तर्फे ‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. 

स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे येत्या सोमवारपर्यंत (ता. ७) चालणाऱ्या या एक्‍स्पोमध्ये शंभराहून अधिक नामांकित उत्पादकांची गृहोपयोगी उपकरणे, फर्निचर आणि गृहसजावटीच्या वस्तूंची रेलचेल असणार आहे. एक्‍स्पोला भेट देणाऱ्यांना आकर्षक ऑफर, लाइव्ह डेमोसह सवलतीही उपलब्ध आहेत. थेट उत्पादक, इंपोर्टर्स आणि होलसेल विक्रेत्यांकडून खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. 

प्रदर्शनात खरेदीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. फर्निचर आणि इंटेरियर डेकॉर, गारमेंट्‌स, फॅशन ॲक्‍सेसरीज, ज्वेलरी, फूटवेअर, फूड प्रॉडक्‍ट्‌स, गिफ्ट अँड नॉव्हेल्टीज यांसारख्या असंख्य वस्तू उपलब्ध असतील. 
फर्निचरमध्ये डिझायनर सोफा सेट, मॉड्युलर किचन, डायनिंग सेट्‌स, बेडरूम पॅकेजेस, वॉर्डरोब्ज, ड्रेसिंग टेबल, शू रॅक्‍सही आहेत. महिलांसाठी ज्वेलरी, कपडे, फूटवेअर आणि अनेक खाद्यपदार्थही एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो २०१७ 
ठिकाण - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेटजवळ 
तारीख - गुरुवार (ता. ३) ते सोमवार (ता. ७) ऑगस्ट  
वेळ - सकाळी ११ ते रात्री ९   प्रवेश विनामूल्य