सभासद नोंदणी, नूतनीकरणासाठी उद्या अंतिम मुदत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’; ७० वर्षांवरील ज्येष्ठांनाही दीड लाखाची सवलत मर्यादा 

पुणे - ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘सकाळ- सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाच्या नावनोंदणीची अंतिम मुदत येत्या रविवारी (ता. ४) संपत आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. सर्वांसाठी एक लाख ५० हजार रुपयांची सवलत मर्यादा असून, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना बिलात ७५ टक्के सवलत मिळणार आहे. योजनेचा कालावधी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ असा आहे.

‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’; ७० वर्षांवरील ज्येष्ठांनाही दीड लाखाची सवलत मर्यादा 

पुणे - ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘सकाळ- सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाच्या नावनोंदणीची अंतिम मुदत येत्या रविवारी (ता. ४) संपत आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. सर्वांसाठी एक लाख ५० हजार रुपयांची सवलत मर्यादा असून, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना बिलात ७५ टक्के सवलत मिळणार आहे. योजनेचा कालावधी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ असा आहे.

एकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी सवलत मर्यादा एक लाख ८० हजार रुपये आहे. अन्य सुविधा व सवलती ः पॅथॉलॉजी चाचण्या, एमआरआय, एक्‍स-रे तपासणी ४० टक्के, बाह्यरुग्ण विभागातील उपचार २० टक्के, दंतचिकित्सा व दंतोपचार २५ टक्के, औषधे १० टक्के, तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी शुल्क रुपये २००, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कॅथेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज. या सर्व सुविधा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या पुण्यातील सर्व शाखांमध्ये उपलब्ध असतील. सभासदांना सवलतीच्या दरातील दर्जेदार आरोग्य सुविधांबरोबर मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. 

नोंदणीची ठिकाणे - (सकाळी ९.३० ते सायं. ५.३०) 
सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल : डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता, सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड - वनाज कंपनीसमोर, पौड रस्ता; सूर्या हॉस्पिटल - शनिवारवाड्याजवळ, कसबा पेठ; सह्याद्री हॉस्पिटल हडपसर - मगरपट्टा कॉर्नर, पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर; सह्याद्री हॉस्पिटल बिबवेवाडी - सुहाग मंगल कार्यालयाशेजारी, बिबवेवाडी; सह्याद्री हॉस्पिटल बोपोडी - (कै.) द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर दवाखाना, जनरल हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर, खडकी कॉर्नर, बोपोडी पोलिस चौकीजवळ; सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता : हर्मिस हेरिटेज फेज २, शास्त्रीनगर, येरवडा.

शुल्क भरण्याचा तपशील
 वय वर्षे ५० ते ६९ पूर्ण या गटासाठी - ३१०० + ६५० रुपये एकरकमी रोख भरावेत. किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ३,१०० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 

वय वर्षे ७० व अधिक या गटासाठी - ४१५० + ६५० रुपये एकरकमी रोख भरावेत. किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ४,१५० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 

सदस्यत्वाच्या नूतनीकरणासाठी सध्याचे ओळखपत्र आणि नव्याने सदस्यत्व घेण्यासाठी वय व निवासाचा दाखला आवश्‍यक. 
 अधिक माहितीसाठी संपर्क : ९६७३३३१२८९ किंवा ९६७३३३१२८४ 
 संकेतस्थळ - www.sahyadrihospital.com

पुणे

नवी सांगवी : पिंपळे गुरव मध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या...

11.18 AM

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण...

11.06 AM

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात...

05.03 AM