'सकाळ वास्तू प्रदर्शना'द्वारे विविध प्रकारचे पर्याय उपलब्धः कुणाल कुमार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुणे : "प्रत्येकजण आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहत असतो, मात्र नाईलाजास्तव त्यांना झोपडपट्टीत राहावे लागते. लोकांची घराची गरज पुर्ण करण्याचे आणि त्यांना विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध करून देण्याचे काम "सकाळ वास्तू प्रदर्शना"द्वारे होत आहे." असे मत आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी व्यक्त केले.

"सकाळ"तर्फे राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी  लॉन्स येथे भरविलेल्या दोन दिवसीय "सकाळ वास्तु 2017" या प्रदर्शनाचे उदघाटन कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी स्टेट बॅंकेचे सहसरव्यवस्थापक गंगाधर दास, "सकाळ"चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, वरिष्ठ सरवस्थापक शैलेश पाटील उपस्थित होते. "रेरा"च्या अंमलबजावणीनंतर पुण्यात भरविन्यात आलेले हे पहिलेच प्रदर्शन आहे. त्यामध्ये 28 स्टॉल्स असून 160 हुन अधिक प्रकल्प आहेत.हे प्रदर्शन रविवारी ही सर्वां साठी खुले असणार आहे.

कुमार म्हणाले, "नोकरी, व्यवसायानिमित्त नागरिक पुण्यात येतात. त्यांनाही आपले हक्काचे घर असावे असे वाटते, मात्र नाईजास्तव त्यांना झोपडपट्टीत राहावे लागते. लोकांना घराची गरज आहे, ती गरज पुर्ण करण्याचे काम हे प्रदर्शन करत आहे."