रंगारी-टिळक वादाबाबत सत्य समोर यायला हवं: संभाजीराजे

टीम ई सकाळ
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे, खरं काय ते लोकांसमोर यायला हवे. सरकारने याची दखल घ्यायला हवी. सर्व पुरावे उपलब्ध आहेत, इथे श्रेयवादाचा विषय आहे. सरकार कुठलेही असो भूमिका योग्य हवी. टिळकांनी गणेशोत्सवाचा प्रचार, प्रसार केला यात शंका नाही.

पुणे : भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असेल आणि याचे पुरावे असतील तर, खरं काय ते लोकांसमोर यायला हवे. सरकार कुठलेही असो भूमिका योग्य हवी, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

संभाजीराजे यांनी आज (बुधवार) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळास भेट दिली. भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या वतीने सध्या चक्री उपोषण सुरु असून, उपोषणकर्त्यांची त्यांनी भेट घेतली. सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केल्याचे पुरावे आहेत, तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. यावेळी भाऊसाहेब रंगारी मंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांना सर्व पुराव्यांची माहिती दिली. तसेच त्यांनी सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचेही सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, की खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे, खरं काय ते लोकांसमोर यायला हवे. सरकारने याची दखल घ्यायला हवी. सर्व पुरावे उपलब्ध आहेत, इथे श्रेयवादाचा विषय आहे. सरकार कुठलेही असो भूमिका योग्य हवी. टिळकांनी गणेशोत्सवाचा प्रचार, प्रसार केला यात शंका नाही. भाऊसाहेब रंगारी यांची दखल घेणे गरजेचे आहे. 1892 मध्ये इकोफ्रेंडली त्यांनी गणशोत्सव सुरु केला होता. केसरीमध्ये सुद्धा याची दखल घेतली होती.

Web Title: Pune news Sambhaji raje visit Bhausaheb Rangari mandal