सामाजिकतेसाठी ‘संवेदना निधी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पुणे - लहान मुलांमध्ये बारीक-सारीक कारणांवरून भांडणे, हाणामारी करणे ही हिंसक प्रवृत्ती वाढत असल्याचे अनेक अभ्यासकांनी सांगितले आहे. ही हिंसक प्रवृत्ती कमी व्हावी, त्यांच्यातील संवेदनशीलता वाढावी, त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, यासाठी ‘संवेदना निधी’ हा एक अनोखा उपक्रम साने गुरुजी प्राथमिक शाळेत राबविला जात आहे.

गोष्टींच्या माध्यमातून शालेय मुलांना समाजातील विविध घटकांची ओळख घडवायची आणि अशा नागरिकांसाठी काही तरी करता यावे, या हेतूने प्रत्येक विद्यार्थ्याकडून दर आठवड्याला एक रुपया निधी जमा केला जातो. हा निधी एका गरजू संस्थेला मुलांच्याच हस्ते प्रदान करण्यात येईल.

शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, ‘‘शालेय वयातच मुलांवर संवेदनशीलतेचे संस्कार घडले तर त्यांच्यामध्ये समाजातील इतर घटकांबाबत आपुलकी निर्माण होईल. ते इतरांची चांगल्याप्रकारे मदत करतील. असे संस्कार घडविणे ही पालकांबरोबरच शाळेचीही जबाबदारी आहे. याच उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे.’’

उपक्रमाचे समन्वयक सोपान बंडावणे म्हणाले, ‘‘या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी प्रार्थना झाल्यावर मुलांना एक गोष्ट सांगितली जाते. त्यात अंध- अपंग नागरिकांच्या अडचणी, वृद्धांच्या समस्या, सेवाभावी संस्थांचे काम, त्यातील मर्यादा आदी विविध विषय हाताळले जातात. लहान आहे म्हणून आपण काय करणार, यापेक्षा छोटीशी का होईना; पण सगळे मिळून मदत करू, हा विचार त्यांच्यामध्ये रुजविला जातो आणि एक रुपया निधी देण्याचे आवाहन केले जाते. याला मुलांकडूनही अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’