स्वच्छताग्राम 'काळदरी'त घरटी परसबागांचा केला निर्धार

स्वच्छताग्राम 'काळदरी'त घरटी परसबागांचा केला निर्धार

सासवड, (ता.  पुरंदर) : पुणे जिल्ह्यात सतत दहा वर्षे स्वच्छता अभियानात नावलौकीक मिळविलेल्या काळदरी (ता. पुरंदर) गावाने घरटी परसबागा करण्याचा ठराव नुकताच संमत केला. विशेष म्हणजे गावातील चारशेपैकी निम्म्या घरांना परसबागा आहेत. त्यात अजून तेवढ्याच पसरबागांची भर टाकत शंभर टक्के परसबागांचे गाव होण्याचा मान काळदरीला मिळू शकेल. 

काळदरी गाव सन 2000 सालापासून स्वच्छता अभियानात आहे. त्यामुळे गावाला स्वच्छतेचे चांगलेच वळण आहे. त्यातून शंभर टक्के गाव हागणदारीमुक्त यापूर्वीच केले. त्याशिवाय आता सांडपाणी, घनकचरा, स्वच्छता शंभर टक्क्यापर्यंत करण्याचा निर्धार करताना.. अपारंपरीक ऊर्जा, वाढीव वृक्षलागवड, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे इथपासून ते आरोग्य केंद्राचा प्रश्न धसास लावण्यापर्यंतचा मार्ग गावाने ग्रामसभेव्दारे निवडला आहे. ग्रामसभेच्या अध्यक्षपदी उपसरपंच अकुंश परखंडे होते. तर सरपंच वंदना यादव, ग्रामसेवक शशांक सावंत, सदस्य प्रकाश थोपटे, शिवाजी पेटकर, सुरेखा परखंडे, कृष्णाबाई शेडगे, वंदना धनावडे, ग्यानबा भगत, अंकुश पेटकर, बायडाबाई कारकर, दिलीप जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत, किरण धुमाळ, संजय जाधव  आदी अनेकजण उपस्थित होते. आपल्या पातळीवर काळदरीने स्मार्ट व्हिलेज होण्याला महत्व दिल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट केले. 

परसबागांमु्ळे घरच्या घरी सांडपाणी सांडपाणी व्यवस्थापन होताना.. विविध भाज्याही घरच्या घरी मिळतात. परिसरात डास, दुर्गंधी, सांडपाणी सार्वजनिक जागेवर पांगणे.. याला आळा बसतो., असे सांगून सरपंच यादव, उपसरपंच परखंडे म्हणाले., शासकीय नियमाने ग्रामसभा वा पंचायतीच्या सर्वसाधारण सभा घेणे.. एवढ्यापुरते कामकाज मर्यादीत न ठेवता नियमीतपणे प्रमुख लोक गावात एकत्र येतो. त्यातून गावात पुन्हा यंदाही स्वच्छता अभियानास गती देण्याचे ठरले. त्याशिवाय नांदेड पॅटर्न पध्दतीने सांडपाण्यासाठी शोष खड्डे घेणे, नॅडप खत खड्डे घेऊन गांडुळखत कचरा निर्मुलनात करणे, त्यास एमआरईजीएसमधून प्रत्येकी नऊ हजारांचे अनुदान लोकांना देणे. बंदिस्त गटर योजनेचा विस्तार करणे.. असेही निर्णय घेतले. आपारंपरीक ऊर्जा निर्मिती वाढविणे, वृक्षलागवड वाढविणे, तसेच वृक्षांना ठिबक सिंचनव्दारे पाणी देणे, मृदा आरोग्य पत्रिकेनुसार पिक बदल करणे आदीही निर्णय घेतल्याचे यानिमित्ताने आज सांगण्यात आले. सर्व कुटुंबियांना वाॅटर मिटरने नळजोड जोडणे, सांडपाण्यावर शक्य तेवढ्या फळझाडांची लागवड करणे, कचऱयात सुका व अोला कचरा वेगळा संकलीत करणे, कचऱयावर प्रक्रीया करुन खत करणे, स्मृतीवनात झाडांची संख्या वाढविणे, त्यातही अौषधी वनस्पती वाढविणे, त्यास विहीरीवरुन ठिबकने पाणी व्यवस्था करण्याचेही ठरले. 

सकाळमुळे जलसाठा वाढला.. मत्यपालनावर लक्ष
सकाळ रिलीफ फंडातून गावाच्या दोन बंधाऱयातील गाळ गतवर्षी काढला. त्यातून जलसाळ्यात मोठी वाढ झाली. त्याशिवाय गावांच्या इतर तलावात पाणीसाठा वाढ झाल्याने मत्यपालन होते, त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचेही यानिमित्ताने ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com