आषाढीनिमित्त संत सोपानकाकांच्या समाधी मंदिरात गर्दी

श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 4 जुलै 2017

पालख्या थांबण्याच्या विसावा विठोबालाही धार्मिक कार्यक्रम 

सासवड : येथील कऱहा नदीकाठच्या संताच्या पालख्या जिथे थांबून विसाव्यात अभंग म्हणतात.. त्या प्रसिध्द विसावा विठोबा मंदिरात व संत सोपानदेव महाराज समाधी मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. दोन्ही मंदिरात आज पहाटे अभिषेक व महापूजा झाली. तर विविध धार्मिक कार्यक्रम हरिपाठ, अभंग, भजन, लोकगीते, भक्तीगीतांचे व फराळ वाटपाचे कार्यक्रम रंगले. 

सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष विजय वढणे, पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, नगरसेवक संजय ग. जगताप, अजित जगताप, प्रविण भोंडे, अनिल उरवणे, अमित पावशे आदींनी दर्शनार्थ आज दोन्ही मंदिरात हजेरी लावली. आषाढी एकादशीनिमित्ताने संत सोपादनदेव समाधी मंदिरात पहाटे समाधीस अभिषेक झाला. तर त्याच दरम्यान काकडारती होताना. हरिपाठ, भजनाचा कार्यक्रम विणा मंडपात रंगला. दुपारी देऊळवाड्यात लोकगीते, भक्तीगीते आळवित महिलांनी सूर धरला. दुपारनंतर प्रवचन व भजन रंगले. तर मंदिराच्या अोवऱयात भाविकांना फराळ वाटप महाजन बंधूंतर्फे होते. तर सोपानकाका बँकेतर्फे गुडदाणी वाटप झाले. गाभाऱयात समाधी, विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनाला व समाधीस सुरवात झालेल्या चिंचेखालील पादुकांना दर्शनार्थ चांगलीच गर्दी होती.
नियोजन मोहन उरसळ हे करीत होते. तर सासवड शहरातील कासराचा मळा व कऱहेवरील विठोबाच्या डोहालगत विसावा विठोबा हे पुरातन मंदिर आहे. येथे सरदार पुरंदरे घराण्यातील नाना पुरंदरे यांनी पहाटे विठ्ठलास अभिषेक व महापूजा केली. तेंव्हापासून दर्शनबारी सुरु झाली. यानिमित्ताने संजय जगताप व नगराध्यक्ष भोंडे यांनी मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. तर रोटरी क्लबतर्फे गुडदाणी वाटप करण्यात आले. येथेही हरिपाठ, भजनाचे कार्यक्रम होते. पुरंदरे व मित्र परिवार विसावा विठोबा मंदिरात संयोजन करीत होते. आषाढीनिमित्त पान, फुल, बुक्का यांची दुकाने थाटली होती. सोपानदेव मंदिरात पोलीस बंदोबस्तही होता.  

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?​
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​