सुवर्णपदकाच्या पात्रतेसाठी विद्यार्थी हा शाकाहारी असावा...

संतोष शाळीग्राम
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पुणे : योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र शेलार (शेलारमामा) आणि सरस्वती रामचंद्र शेलार यांच्या नावाने विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे सुवर्णपदकाच्या पात्रतेसाठी विद्यार्थी हा शाकाहारी असावा, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र, पुरस्कारासाठी अनामत रक्कम देणार्या व्यक्तींनीच ही अट घातली आहे. हा विद्यापीठाने तयार केलेला नियम नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विज्ञानेतर विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला शेलारमामा यांच्या नावाने दरवर्षी सुवर्णपदक प्रदान केले जाते. तसेच विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीस सरस्वती शेलार यांच्या नावाने सुवर्णपदक प्रदान केले जाते.

विद्यापीठाने सुवर्णपदकासाठी महाविद्यालयांकडे नावे मागितले आहेत. त्याची नियमावली त्यांना पाठविण्यात आली आहे. त्यात, शाकाहारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असावी, असा उल्लेख आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून हे सुवर्णपदक दिले जाते. त्यातील अटी या विद्यापीठाने तयार केलेल्या नाहीत. सुवर्णपदकासाठी रक्कम देणार्या व्यक्तींच्या इच्छेनुसार नियम तयार केलेले आहे."