‘मॉन्सून डेस्टिनेशन’साठी हवे सेकंड होम?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

ग्रीन होम एक्‍स्पो - ‘सीझन १५ चे’ १२ ऑगस्टला आयोजन

पुणे - कोसळत्या श्रावण सरींनी वातावरण उल्हासदायक झाले आहे. मॉन्सूनच्या आगमनानंतर प्रफुल्लित होणारी पर्यटनस्थळे गजबजू लागली आहेत. अशाच एखाद्या आवडत्या डेस्टिनेशनवर आपले ‘सेकंड होम’ असावे, असे प्रत्येकाच्या मनी असतेच. या स्वप्नाला साकारणाऱ्या ‘ग्रीन होम एक्‍स्पो’च्या ‘सीझन १५’ला १२ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे.

‘सकाळ- ॲग्रोवन’च्या वतीने ‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन १५’चे आयोजन केले आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंचमध्ये होणाऱ्या ‘ग्रीन होम एक्‍स्पो’मध्ये राज्यातील प्रमुख शहरांभोवतीचे फार्म हाऊस, बंगलो प्लॉट्‌स, वीकेन्ड होम्स व संबंधित सेवांची माहिती घेण्याची संधी ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. आपली मालमत्ता विकू इच्छिणाऱ्या संस्थांनाही एकाच वेळी हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचण्याची संधी यातून मिळणार आहे.

‘ग्रीन होम एक्‍स्पो सीझन १५
दिनांक :  १२ ते १३ ऑगस्ट
प्रदर्शन स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : हनुमंत -७४४७४८९१५३ ,
अक्षय - ७४४७४८२६१९