अकरावी प्रवेशासाठी सोमवारपासून दुसरी फेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पुणे - अकरावीच्या प्रवेशासाठी चार सप्टेंबरपासून दुसरी विशेष फेरी सुरू होणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जाहीर होईल. या फेरीला आरक्षण लागू नसेल. दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण, एटीकेटीसह उत्तीर्ण आणि आधी प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील.

पुणे - अकरावीच्या प्रवेशासाठी चार सप्टेंबरपासून दुसरी विशेष फेरी सुरू होणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जाहीर होईल. या फेरीला आरक्षण लागू नसेल. दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण, एटीकेटीसह उत्तीर्ण आणि आधी प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील.

दहावीत एटीकेटीसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्रावर जाऊन अर्जाचा भाग एक मान्य (ऍप्रूव्ह) करून घ्यावा लागेल. त्यानंतरच त्यांना अर्जाचा दुसरा भाग (पसंतीक्रम अर्ज) भरता येईल. अद्याप प्रवेश मिळाला नाही, ऑनलाइन प्रक्रियेत अर्ज आधी भरला नाही, अर्धवट अर्ज भरल्याने प्रवेश प्रक्रियेत भाग घेता आला नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही फेरी असेल.

विद्यार्थ्यांनी आधी पसंतीक्रम अर्ज भरला असेल, तर तो या फेरीत कोरा केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्याने पसंतीक्रम अर्ज भरावा लागेल. या फेरीला कोणत्याही आरक्षणाचे निकष लागू नसल्याने सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.

खुली फेरी पुन्हा होणार
दुसऱ्या विशेष फेरीनंतर खुली फेरी होणार आहे. त्यामध्ये "प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्रवेश' या तत्त्वावर खुल्या फेरीत प्रवेश मिळतील. त्यासाठी 12 सप्टेंबर रोजी रिक्त जागांचा तपशील प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. फेरीचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालय 11 सप्टेंबर रोजी जाहीर करणार आहे.

दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक
दिनांक वेळ तपशील

2 सप्टेंबर सायं. 5 सर्व रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध.

4 ते 7 सप्टेंबर सकाळी 11 ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक व दोन भरणे.
ते सायं 5 (मार्गदर्शन केंद्र 4,6,7 सप्टेंबर रोजी सुरू राहतील)

8 सप्टेंबर सकाळी 11 दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर

8 सप्टेंबर दुपारी 12 ते 5 मिळालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश
(प्रवेश निश्‍चितीसाठी संगणकीकृत पावती सक्तीची)
9 ते 11 सप्टेंबर स. 10 ते 5