राष्ट्रपतीपदासाठी पवारांनी नाही म्हणू नये: प्रतिभाताई पाटील

उमेश शेळके
गुरुवार, 1 जून 2017

राजकारणात मी शरद पवारांना सिनियर आहे. शरद पवारांनी स्मरणशक्ती विलक्षण आहे. आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांसोबतच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची नावे त्यांना माहीत असतात. ते एक विलक्षण बुद्धिमत्ता असलेले व्यक्तित्व आहेत.

पुणे - राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले जात आहे आणि त्यांचा नकारही असल्याचे मी ऐकले आहे. परंतु राष्ट्रपतीपदासाठी त्यांनी नाही म्हणू नये. ते कधी सल्ला मागत नाहीत, परंतु मी माझे विचार सांगते, असे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले आहे.

बालगंधर्व येथे एका कार्यक्रमात बोलताना प्रतिभाताई पाटील व शरद पवार एकत्र आले होते. या कार्यक्रमात प्रतिभाताई पाटील यांनी पवार यांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये अशी इच्छा व्यक्त केली.

प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, की राजकारणात मी शरद पवारांना सिनियर आहे. शरद पवारांनी स्मरणशक्ती विलक्षण आहे. आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांसोबतच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची नावे त्यांना माहीत असतात. ते एक विलक्षण बुद्धिमत्ता असलेले व्यक्तित्व आहेत. शरदरावनी राजकारणातील 50 वर्षे पूर्ण केली हे खूप मोठी बाब आहे. वेगवेगळ्या राजछटांचे व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार. 50 वर्षानंतर जेव्हा कधी भारतातील राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख होईल.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला