दिपालीला गरिबीमुळे पेन ऐवजी खुरपं घेण्याची आली वेळ...

deepali kale
deepali kale

पुणे (टाकळी हाजी, ता. शिरूर): कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत 75.69 टक्के गूण मिळवून विद्यालयात दिपाली प्रदीप काळे ही प्रथम आली. पण घरची गरिबीची परीस्थीतीने तिच्यावर पेन ऐवजी खुरप घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तिला समाजातून मदतीचे आवाहन प्राध्यापक अनील शिंदे यांनी केले आहे.
 

कान्हूर मेसाई येथील विद्याधाम शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील पारधी समाजातील शेतमजूरी करणारी सुरेखा काळे या माउलीने गरीब परिस्थीतीत मुलींना शिक्षणाची गोडी लावलेली पहावयास मिळत आहे. परिस्थीतीला सामोरे जात मोलमजूरी करत सावीत्रीबाई फुलेंचा शिक्षणाचा वसा तिने घेतला आहे.

मुलींना शिक्षण देऊन अधिकारी बनवायच अशी जिद्द या माउलीने बांधली असल्याने तिच्या जिद्दिला सलाम करत प्रा. शिंदे म्हणाले की, दिपालीने चिंचोली मोराची येथील जय मल्हार माध्यमिक विद्यालयात दहावीत 68 टक्के मिळविले. कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत 75.69 टक्के गूण मिळवून विद्यालयात ती प्रथम आली. पारधी समाज हा अज्ञानाने भरलेला आहे. शिक्षणाने हा समाज प्रगत होईल. यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना झाल्या. मात्र अशा प्रकारची शैक्षणीक प्रगती ही बोटावर मोजण्या इतकी आहे. खडतर जीवनाच्या वाटेवर काटेरी कुंपनात वेळ मिळेल त्यावेळी तिने अभ्यास केल्याने तिला यश मिळाले आहे. पुढील शिक्षणासाठी आईबरोबर मोलमजूरी करत आहे. विद्यार्थी जीवनातील हा तिचा आदर्श आहे. तिच्या या जिद्दीला समाजातून मदतीचा ओघ मिळणे आवश्यक आहे. शिक्षणप्रेमींनी तिला मदत करावी. असे त्यांनी सांगितले.

स्वावलंबी शिक्षण...
मोलमजूरी करून या माउलीने तीन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. कमवा व शिका...स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद... कर्मवीर भाऊराव पाटिल यांचे वाक्य खरी ठरत आहेत. अधिकारी बनण्याची जिद्द महत्वाची असून पोलिस भरतीसाठी तिला लवकरच प्रशिक्षण देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ई सकाळवर 'दिपाली बारावीत साळंत पहिली आली, लय आनंद झाला...' या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी आमच्याशी संपर्क साधून मदत करण्यासाठी बँक खात्याची माहिती मागितली होती.

आर्थिक मदतीसाठी संपर्कः
दिपाली प्रदिप काळे
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- मलठण
खाते क्रमांक : 60138135978
ifsc coad: MAHB0001715

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांकः प्राध्यापक अनील शिंदे 9921224491

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com