जांबूतला महिलांना फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण

युनूस तांबोळी
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे):महिलांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी त्यांना फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जांबूतचे सरपंच डॉ. जयश्री जगताप यांनी दिली. जांबूत येथील अस्मिता भवनामध्ये आयसीआयसीआय फाउंडेशन व हरिता कंपनीच्या वतीने महिलांसाठी फॅशन डिझाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी त्या बोलत होत्या.

जगताप म्हणाल्या, सांसद आदर्शग्राम जांबूत येथील महिलांना आर्थिक साधन मिळवून देण्यासाठी काम केले जात आहे. महिला सक्षम व्हाव्यात यासाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात महिलांसाठी आरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात 40 महिलांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती प्रशिक्षक ज्योती वाघमारे यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :