...आरोग्य व आहाराची काळजी घेणे आवश्यक

युनूस तांबोळी
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): शुन्य ते सहा वयोगटातील बालक हा देशातील भावी पिढी असल्याने त्याच्या आरोग्य व आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या बरोबर कुपोषीत बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत घेण्याचे आवाहन पर्यवेक्षीका माणीक देडगे यांनी केले.

कवठे येमाई (ता. शिरूर) येथे एकात्मिक बाल विकास केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यासाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच सुदाम इचके, पर्यवेक्षीका नंदा पाटोळे, मिना वायाळ, वैभवी उघडे, दत्तात्रेय सांडभोर, आरोग्य सहाय्यक बी. डी. पठारे, रामदास इचके, दिनेश काळे, अंगणवाडी सेवीका, आशा सुपरवायझर आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

सरपंच इचके म्हणाले की, कवठे येमाई येथील बिट मध्ये प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ग्रामबाल विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कायक्रमाचे सुत्रसंचालन हिराबाई पोकळे यांनी केले. आभार बिसमिल्ला तांबोळी यांनी मानले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :