भाजप-शिवसेनेत श्रेयासाठी संघर्ष 

भाजप-शिवसेनेत श्रेयासाठी संघर्ष 

पुणे, कोथरूड - कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी-आयडीयल कॉलनी प्रभागामधील विकासकामांबाबत शिवसेनेने फलकबाजी करताच, नागरिकांच्या नावाखाली शिवसेनेच्या नगरसेवकाचे उपरोधिक अभिनंदन करणारा फलकही उभारण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागात ‘एलईडी’ दिवे उभारण्याच्या श्रेयावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता आहे. प्रभागात फलक उभारला नसल्याचे भाजपने स्पष्ट केले तर, हा फलक भाजपने जाणीवपूर्वक लावल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. 

या प्रभागात सर्वत्र ‘एलईडी’ दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, प्रभागातील ड गटात शिवसेनेच्या स्थनिक नगरसेवकाने फलक उभारले आहेत. परंतु, ‘शहरभर 

महापालिकेच्या वतीने सव्वालाख दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खोटी प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांतर्फेच अभिनंदन अशा आशयाचा फलक उभारला आहे. तोही शिवसेनेच्या फलकाशेजारी उभारला आहे. त्यामुळे हा फलक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभारल्याची चर्चा आहे. तसेच, ‘सोशल मीडिया’वरही या विषयाची चर्चा सुरू आहे.  

शहर पातळीवरील भाजप आणि शिवसेनेतील छुपा संघर्ष वाढतो आहे. त्यातच, कोथरुडमध्ये तर, या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच राजकीय संघर्ष होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातूनच एकाच प्रभागातील विकासकामांवरून दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार हे या प्रभागाचे नेतृत्व करीत आहेत. तेथे भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com