महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पुणे: राज्यात भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा असल्याने शांत राहिलेली शिवसेना आता आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. महागाईच्या निषेधार्थ पुण्यात येत्या मंगळवारी (ता. 26) शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयावर "लाटणे मोर्चा' काढून राज्य सरकारला महागाईचा जाब विचारणार आहेत. यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचा शिवसेनेचा इरादा आहे. विशेष म्हणजे, मोर्चाच्या तयारीसाठी स्थानिक नेतेमंडळी एकत्र येणार आहेत.

दिवाळीच्या तोंडावर सामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागत असल्याने हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शहर संघटक श्‍याम देशपांडे यांनी दिली.

मोकाटे म्हणाले, ""महागाईने सामान्य नागरिक अडचणीत आला आहे. किमान सणासुदीत तरी नागरिकांना दिलासा देण्याचे निर्णय सरकार घेत नाही. याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या पुढील काळात शिवसेना आक्रमक होणार आहे.''

बाबर म्हणाले, ""शहरातील सुमारे पाच ते सात हजार महिला कार्यकर्त्या आणि सामान्य नागरिकांचा यात सहभाग असणार आहे. शहरभर त्याचे नियोजन केले असून, सर्वच नेते त्यात सहभागी होणार आहेत.''