शिवणे रस्त्याला खड्डे; कृती समितीचे जन आंदोलन

राजेंद्रकृष्ण कापसे 
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

फ्लेक्स युद्ध रंगले
कृती समितीच्या वतीने पक्ष विरहित मोर्चा जनआंदोलन घेण्याचे नियोजन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी आंदोलनाचे फ्लेक्स लागले आहेत. दरम्यान, खडकवासला भाजपच्या वतीने रस्त्याचे काम मंजूर झाले असून त्याचे लवकरच भूमिपूजन होणार असल्याचे फ्लेक्स लागले आहेत. यामुळे, दोन्ही फ्लेक्स बाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. 

कोंढवे धावडे : शिवणे- कोंढवे धावडे या रस्त्याला हजारो खड्डे पडले असून त्याची तात्पुरती डागडुजी केली जाते. तरी देखील रस्त्याचे खड्डे वाढत चालले आहे. परिणामी या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने जनसेवा उत्कर्ष स्वयंसहायता बचत गट व शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे कृती समितीच्यावतीने रविवारी सकाळी जन आंदोलन मोर्चाचे आयोजन केले आहे.

दीड वर्षापूर्वी रस्ता रुंद करण्यासाठी इमारती पाडल्या. त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. सहा महिन्यांपूर्वी काही ठिकाणी रस्ता डांबरीकरण झाला. तेथे पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्था केली नाही. आताच्या पावसात शिवणे येथील शिंदे पूल, देशमुखवाडी, बँक ऑफ इंडिया समोर, उत्तमनगर अचानक चौक, बाजार समिती, उत्तमनगर बस थांबा, पोलीस चौकी, ते श्रीमंत भैरवनाथ गणपती मंडळ, भीमनगर पूल ते कोंढवा गेट, कुंजाई पूल ते दहा नंबर या परिसरात जुन्या- नव्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. येथील खड्डे मुरमाने भरले. उन्हाने धुरळा उडतो. पाऊस झाला की चिखल होतो. हे आंदोलन कोणत्या ही पक्षाचे नाही. कोणता ही झेंडा नाही. रस्त्याचा त्रास होणार नागरिक स्वतःहुन सहभागी होणार आहेत. असे या आंदोलनाचे आयोजक कृती समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच सुरेश गुजर यांनी सांगितले.

महिन्यात काम सुरू होणार- तापकीर
दरम्यान, हा रस्ता खराब झाला असल्याने व रुंदिकरणासाठी मी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात यावर सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्याची प्रशासकीय परवानग्या मिळाल्या असून हे काम तातडीने सुरू करण्यासाठी कमी वेळेत टेंडर काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यास मंजुरी मिळाली आहे. 20-25 दिवसात टेंडर प्रक्रीया पूर्ण होईल. प्रत्यक्ष काम सुरू होईल असा दावा.आमदार भीमराव तापकीर यांनी केला आहे. 

फ्लेक्स युद्ध रंगले
कृती समितीच्या वतीने पक्ष विरहित मोर्चा जनआंदोलन घेण्याचे नियोजन करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी आंदोलनाचे फ्लेक्स लागले आहेत. दरम्यान, खडकवासला भाजपच्या वतीने रस्त्याचे काम मंजूर झाले असून त्याचे लवकरच भूमिपूजन होणार असल्याचे फ्लेक्स लागले आहेत. यामुळे, दोन्ही फ्लेक्स बाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे. 

Web Title: Pune news Shivne road agitation