अण्णा भाऊंनी समाजमन घडविले - डॉ. सबनीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

पुणे - ""मानवतावादी, विद्रोही, सर्वस्पर्शी अशी भूमिका अण्णा भाऊ साठेंनी त्याकाळात मांडली आहे. केवळ प्रतिमेला हार घालून आणि गुणगान करून अण्णा भाऊ समजू शकणार नाहीत. त्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील. अण्णा भाऊंना समाजोत्थान अपेक्षित होते. आपल्या क्रांतिकारी कर्तृत्वाने त्यांनी समाजमन घडविले,'' असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे व्यक्त केले. 

फुले- शाहू- आंबेडकर विचार मंचातर्फे दलित पॅंथरचे यशवंत नडगम यांना "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार' देऊन सबनीस यांच्या हस्ते सोमवारी गौरविण्यात आले. दादासाहेब सोनवणे, प्रा. विलास वाघ, आर. के. लोंढे, विठ्ठल गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. 

सबनीस म्हणाले, ""श्रमिक आणि गरिबांच्या वेदना जाणणारा आणि वंचितांचे कैवार घेणारा महान कलावंत लेखक अण्णा भाऊ होते. त्यांनीच जगात पहिल्यांदा मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवाद यांतील भिंत पाडली.'' 

नडगम म्हणाले, ""नामदेव ढसाळ यांचा सहवास मला मिळू शकला, हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्यामुळेच मी दलित पॅंथरच्या माध्यमातून समाजाच्या अनेक समस्यांना प्रत्यक्ष समजून घेऊ शकलो.'' 

पाटील मराठी साहित्याला कलंक ! 
निवृत्त होण्याआधी केवळ चार-पाच दिवसांत तब्बल 450 फायली निकालात काढण्याची "कार्यक्षम' कामगिरी आणि "गतिमानता' दाखवणाऱ्या विश्‍वास पाटील यांच्याएवढी कार्यक्षमता मी कुठेही पाहिलेली नाही, असा टोला आपल्या भाषणात सबनीस यांनी मारला. विश्‍वास पाटील यांच्यासारखे लेखक मराठी साहित्यविश्‍वाला आणि मराठी संस्कृतीला कलंक आहेत, असेही सबनीस म्हणाले.