ऋतुजा, शुभांगी यांनी जिंकली रसिकांची मने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे - मलेशिया येथील हॉर्नलॅंड डान्स थिएटरने घेतलेल्या ‘सिबू इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल’ या नृत्य महोत्सवात पुण्याच्या सखी संस्थेतील कथक नृत्यांगना ऋतुजा कुलकर्णी आणि भरतनाट्यम नृत्यांगना शुभांगी लिटके यांनी सहभाग घेतला. महोत्सवात त्यांनी भारतीय नृत्यकलेचा आविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. २३ देशांतील नर्तकांचा सहभाग असलेल्या या महोत्सवात दोघींनी शिवस्तुती, सखी नृत्यरचना आणि इतर नृत्यप्रकार सादर केले. 

महोत्सवात मुख्य नृत्य कार्यक्रमात दोघींनी कथक आणि भरतनाट्यमचा संगम एकाच मंचावर सादर केला. त्याला परदेशी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. दोघींनी ‘कथक आणि भरतनाट्यम’ची ओळख या विषयावर महोत्सवात कार्यशाळा घेतली. भारत, अमेरिका, स्पेन, तैवान, ब्राझील, चीन आदी देशांतील १५० नर्तकांनी महोत्सवात सहभाग नोंदवला. 

ऋतुजा ही कथक नृत्यांगना शमा भाटे यांची शिष्या असून, शुभांगी ही डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांची शिष्या आहे. ऋतुजाने कथक, तर शुभांगी हिने भरतनाट्यम या विषयात सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.